कथा : ब्रँडेड जगणं...
"ब्रँडेड जगणं..."
डॉ.सूरज चौगुले,
इस्लामपूर 9371456928
" दीड कोटी रुपयांचे प्रोजेक्ट अन तेही फक्त आपल्या नावाच्या मार्केटमध्ये असलेल्या ब्रँडवर आपणाला मिळालं यासारखे आणखी काय यश असू शकतं? खरं तर एवढ्या उंचीवर पोहोचण्यासाठी लोकांना आपली अख्खी हयात घालवावी लागते, पण मी तर वयाच्या अवघ्या अडतिसाव्या वर्षी हे सारे मिळवलं. प्रचंड यश, संपत्ती, पैसा, प्रसिद्धी आणि हो ! कुणीही गॉडफादर नसताना आज इतक्या उंचीवर मी पोहोचलोय की माझ्याकडे पाहताना माझ्या सहकाऱ्यांना मान वर करावी लागते." या साऱ्या विचारांच्या तंद्रीत अजयने गाडीच्या बाहेर पाहिलं, विचाराच्या तंद्रीत आपण 'सौदी घाटात' कधी पोहोचलो ते कळालेच नाही. घाटात गाडी चढणीला लागली अतिशय अवघड वळणावळणाने त्याची गाडी घाट चढत होती आणि अशा अवस्थेतही आपण आपल्या व्यवसायातील यशाचे शिखर कसं लीलया चढलो हे आठवून त्याला स्वतःवर प्रचंड अभिमान वाटत होता. डिसेंबरचा शेवटचा आठवडा होता, दिवस लवकर मावळायचा अजयनेही आपल्या गाडीच्या लाइट्स लावल्या, घाटातील मंद वाहणाऱ्या हवेला त्याच्या गाडीत प्रवेश नव्हता, त्याने आत ए.सी.लावला होता. आजचा प्रोजेक्ट त्याच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट यश होतं. कदाचित यशाची ग्लानी आणि प्रचंड मानसिक थकवा या दोन्ही गोष्टीच्या संमिश्र प्रतिक्रिया त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होत्या. अशा अवस्थेत गाडीच्या वेगाचा त्याला अंदाज नव्हता त्याची कार घाटाच्या माथ्यावर आली, आता उतरणीला लागायच्या अगोदरच एक धोकादायक वळण आणि नेमके याच वळणावर अजयचा गाडीवरचा ताबा सुटला गाडीचा वेग आणि अवघड वळण यांचा निश्चित अंदाज न आल्याने अजयची गाडी दगडी कठडा तोडून प्रचंड वेगाने दरीमध्ये कोसळली.अनेक झूडपांना तोडत गाडी खाली जात होती. सीट बेल्ट न लावल्याने अजय दोन वेळा स्टेरिंग वर आदळलाआणि पाठी मागे फेकला गेला, अशातच एका मोठ्या खडकाला जोराची धडक बसली आणि समोरची काच फुटून अजय समोरून बाहेर फेकला गेला. रस्त्यापासून किमान पाचशे मीटर खाली, गाडी खडकाला धडकून पलटी होत दोन झाडाच्या मध्ये अडकून बसली तर गाडीपासून खाली दहा एक फुटावर अजय पडला होता.
गाडीचा ताबा सुटल्यानंतरचा गाडीचा वेग आणि अजय सह गाडी खाली येण्याचा वेग, अजय अनुभवत होता. काय कराव त्याला सुचत नव्हतं अशातच जोराचा धक्का आणि त्याचं स्टियरींगला आदळणे, छातीवर प्रचंड दाब, असह्य वेदना, पुढच्या क्षणी आतल्याआत झालेली धडपड आणि अचानक काचेचा पडदा भेदून आपण बाहेर फेकल जातोय याची जाणीव त्याला होते न होते तो पर्यंत डोक्याला जोराची धडक, डोळ्यापुढे गडद अंधार ! मघाच्या वेदनेचा पराभव करीत दुसरी वेदना उसळी मारून त्याच्या डोक्यातून बाहेर येऊ लागली. आणि पुढच्या क्षणी शरीराच्या सर्व संवेदना बधीर होऊन तो एका उतरणीच्या दगडावर अस्ताव्यस्त पसरलेला होता. अंधार वाढला होता, मघापासूनची सारी धड - धड, आवाज ,भीती, वेग, सार-सार निसर्गाने आपल्या पोटात घेतलं. जणू काही झालंच नाही असं! हवेची मंद झुळूक पुन्हा वाहू लागली, गाडीचा आवाज थांबला, पानांची सळसळ थांबली, इतकच काय अजयची वेदनाही थांबली. बधिर शरीरातून काही वेळ कोणतीच हालचाल नाही की कोणती क्रिया प्रतिक्रिया ही नाही. निसर्गही त्याच्यामध्ये झालेले अतिक्रमण किती सहजपणे स्वीकारतो .....!
थोड्यावेळाने अजयची हालचाल जाणवू लागली, हळूहळू तो मोठ्या प्रयत्नाने उठुन बसला, आपला जड हाता त्याने आपल्या कपाळावर लावला तर, साकळलेले रक्त त्याच्या हाताला लागले. अंधारात त्याला काहीच दिसत नव्हतं, आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची तो चाचपणी करीत होता, हात,पाय, डोकं, मगाशी छातीत आलेली ती असह्य वेदना त्याला आठवली, त्यांने आपल्या छातीवर हात फिरवला. सारं शरीर जणू तो आजच निरखून पहात होता. किती वेगाने हे शरीर खाली खेचल गेल होतं, खरं तर गेल्या दहा वर्षात या शरीराबद्दल ही विचार करायला त्याच्याकडे वेळ नव्हता. आतापर्यंत मनाची आणि शरीराची शर्यत लागलेली असायची.मन काहीतरी मिळवण्यासाठी प्रचंड वेगाने पळायचं आणि मग त्याच्या मागे शरीर एखाद्या जनावराला फरफडत ओढावं तसं घसपटीत ओढत जायचं. एखाद्या गाडीच्या चाकात एखादा फडक अडकाव अन गाडीच्या चाकासोबत रस्त्याला घासत ते ओढत पुढं जावं असं त्याचं शरीर ही त्याच्या मनासोबत धावत होतं. अवास्तव धावपळ, जागरण, खाण्यापिण्याच्या सवयी आणि मग यातून काही बिघडलं तर पेनकिलर अन अँटीबायोटिकची भीती दाखवत त्या शरीराला आपण कसं शांत करीत होतो हे सारं अजयला आठवू लागलं. त्याने कसंतरी उठण्याचा प्रयत्न केला, हाती लागलेल्या झाडाचा आधार घेत तो कसाबसा उभा राहिला. दोन्ही हाताने त्याने झाडाला घट्ट पकडले होते, आज त्याला आपल्या दोन्ही पायाचे अन दोन्ही हाताचे आभार मानावेसे वाटले, म्हणून त्याने आपल्या शरीराला हीच विनंती केली की आज तरी तू माझी साथ सोडू नको.त्यांन वर पाहिलं पण त्याच्यासाठी तर दिशाही अदृष्य झाल्या होत्या.तो जनू शरीराला सांगत होता की," मला वर रस्त्यापर्यंत तुम्ही पोहोचवायलाच हवं. आपण प्रचंड वेगाने खाली कोसळलो हे त्याला कळत होतं, परंतु वर जायची दिशाच तू विसरून गेला होता.
एक- एक पाऊल तो आता चढणीवर टाकत होता. वर चढन हे त्याच्या रक्तातच होतं त्यामुळे अंधारात ती त्याने यशाचा मार्ग शोधला होता. फक्त शरीराने त्याला साथ द्यायला हवी. पंधरा एक लाखाची कार एखाद्या प्रेतासारखी पुढे पडली होती पण त्याच्याकडे त्याच लक्षही गेलं नसावं. तो एक एक पाऊल पुढे टाकत होता, अंगातील जडपण त्याला पुढे जाऊ देत नव्हतं, परंतु त्याला कसंही करून त्याच्या शरीराला दवाखान्यात पोहोचवायचं होतं,त्याला आठवलं उद्याच्या वर्तमानपत्रात बातमी छापून येणार,"यशस्वी युवा उद्योजक अजय कदम यांच्या गाडीला अपघात, अजय कदम जखमी."मग त्याने ठरवलं कसंतरी वर जाऊन डॉक्टर शहाना फोन करून त्यांच्याच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हावं,त्यांच्या दवाखान्याच स्टील डिझाईन तर मीच केले आहे.त्यांना अगोदरच माझ्यासाठी एक सूट ठेवायला सांगतो.पण आता पंधरा दिवस कोणालाही भेटायला येऊ देणार नाही, आता हे काम अंजलीच करेल ती तर कोणालाच फिरकू देणार नाही.ती मला इतकं ओरडणार की आता तिला समजावता समजावता माझ्या नाकी नऊ येणार. "हो बाई! नाही कुणाला भेटत, पण माझ्या वार्डच्या बाहेर एक नोटबुक ठेव, आणि भेटायला येणार्यानी माझ्याबद्दलच्या ज्या सदिच्छा,भावना व्यक्त करायच्या आहेत ते त्यांनी त्या नोटबुक मध्ये लिहायला सांग. आपल्याला कळेल तरी आपलं कोण अन परकं कोण? कोण आलं, कोण गेलं? ही माझी गोष्ट नक्की ती नक्की ऐकेल कारण तिलाही मार्केट मधे माझा ब्रँड काय आहे अन मला कोणकोण भेटायला येणार ते." त्याला पुन्हा वाटलं आता फक्त अंजलीने माझ्या जवळ बसून राहावं, डोक्यातून हात फिरवावा, बापरे! किती दिवस झाले ? माझ्या गेल्या वाढदिवसाला माझ्या चिमुरडीने हातात कंगवा घेऊन मला म्हटली होती," पप्पा थांबा मी तुमचं हेअर स्टाईल करते, कुठली हेअर स्टाईल !सारे केस विस्कटून टाकले" आणि त्या बहाण्याने अंजलीने माझ्या केसातुन हात फिरवीत ते केस सरळ केले होते, पुन्हा संधी नाहीच." अचानक त्याचा पाय घसरला आणि तो दोन-तीन फूट खाली घसरत आला. आजूबाजूची झुडपे त्याच्या हाताला येत होती पण खाली किती खोली आहे याचा त्याला अंदाज येत नव्हता.
लहानपणी आई सोबत बस मधून प्रवास करताना "कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी" हे गीत गुणगुणत घाटातून जातानाचा प्रसंग त्यांला आठवला. एखाद अवघड वळण आलं की पोटात गोळा यायचा आणि मी मोठ्याने ओरडायचा, आई पटकन माझ्या डोळ्यावर हात ठेवायची आणि तिच्या मांडीवर घ्यायची. मग घाट जाईपर्यंत डोक्यावरून हात फिरवत राहायची. आज ती गाडीत असती तर ! मी घाबरलो होतो तेव्हा तिने माझ्या डोळ्यावर हात ठेवला असता का? डोक्यावरून फिरवला असता का?" अचानक त्याच्या मनात विचार आला," बघूया नाहीतर अंजली अन मुलांना घेवून गावी जातो, परवा अन कालही आईचे तीन चार मिस कॉल होते मोबाईलवर पण मीटिंग च्या नादात विसरलोच मी!" पुन्हा त्याचा हात खिशात मोबाईल साठी गेला परंतु तो ही साथ सोडून गेल्याचं त्याला आठवलं. हाताने चाचपडत त्याने वरच्या दगडाचा अंदाज घेतला पण हाताला काहीच लागत नव्हतं. एका झाडाच्या आधाराने तो तिथेच खाली बसला. घोट्यापासून खाली त्याचा उजवा पाय पूर्ण बधीर झाला होता. त्याला ओढत नेहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. डोळ्यात बोट घातले तरी पुढचं काही दिसत नव्हतं. "रात्रीच्या अंधाराला घाबरणारा मी आता किर्र अंधारात त्या डोंगरदऱ्यात पाय पसरून बसलोय" यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याला आठवलं दहावीला असताना गावात रात्री शाळेत अभ्यासिकेला जायचं त्यावेळी सर्व म्हणायचे,"शाळेच्या मागे एका पिंपळाच्या झाडाखाली एका जुन्या साधूची समाधी आहे, तिथे तो साधू अन्य आत्म्यासह चिलीम ओढीत बसायचा, ते ऐकून रात्री शाळेच्या मागच्या बाजूला पाहण्याचही कधी धाडस झालं नाही. पण नंतर बर्याच वर्षानी कळालं साधू च्या नावाखाली शाळेतील थोराड पोरंच तिथे रात्री बिड्या ओढत बसायचे. हे सारं आठवलं आणि अजयला गावाची आठवण झाली.
"मागे पाडव्याच्या वेळेला आमच्या दहावीच्या बॅचने गेट-टुगेदर घेतल होत, मला खास आमंत्रण होतं,अर्थात खास आमंत्रण असल्या शिवाय मी कुठे जात ही नव्हतो.शेवटी आपण एका उंचीवर गेलो की आपल स्टेटस आपल्यालाच मेंटेन कराव लागत. तस तिथे गेले तर काय सारी छोटी-मोठी नोकरी व्यवसाय करणारी पोरं ! माझ्या सोबत आणखी एक इंजिनियर झालेला अर्थात खाजगी कॉलेज मधून! तो पुण्याहून अलीकडेच गावाकडे राहिला आलेला तरी ही मी त्याच्या सोबत राहणं पसंत केलं. शेना मूताचा वास येणाऱ्या काही मित्रांपासून मी मात्र लांबच राहिलो. इंजिनियर मित्रालाही मी सांगत होता की, "आरे पुणे सोडलस ती तू खूप चुकीचं केलंस, काय घेऊन बसलायस गावात? हे गाव कुठे पळून जात नाही ! जग जितक्या लवकर कवेत घेता येईल तेवढं घ्यायचं ! मी बघ 5 परदेश वार्याही करुन आलो." आज ते सारे मित्र त्याला दिसत होते. एकदा आठवीत असताना चिंचेच्या झाडा वरून खाली उतरण्यासाठी याच मित्रांनी त्याची मदत केली होती. एकाच्या खांद्यावरून त्यांनी त्याला खाली घेतलं होतं. "अरे कोणी आहे का..." तो मोठ्याने ओरडू लागला,अचानक सर्व मित्रांची मोठमोठ्याने नावे घेऊन हाका मारू लागला, त्याला काय करावं कळेना.ओरडून त्याच्या घशाला कोरड पडली.मध्येच तो आईला आई ग!....आई ग....! म्हणून मोठ्याने ओरडायचा, त्याच्या आवाजची त्यालाच भीती वाटू लागली. तो पुन्हा शांत झाला.आज रात्र मात्र गोगलगायीच्या गतीने पुढे सरकत होती.
पहाटेची चाहूल लागली आणि अजयने अक्षरशः सरपटत वर चढण्याचा प्रयत्न सुरू केला. "दीड करोडचा प्रोजेक्ट माझ्या हातात आणि या प्रोजेक्टचा मालक मी सरपटत चाललोय! पश्चिम महाराष्ट्रात माझ्या पंगतीला बसू शकतील असे फक्त चार-पाच इंजिनियर आणि व्यावसायिक,त्या मध्ये ही माझं स्पेशलायझेशन मी वेगळे जपलं. आज माझं वागणं म्हणजे माझा एक ब्रँड बनला आहे. अर्थात तो मी बनवलाय! किदया-मुंग्या प्रमाणे कोणीही जगत, मी ब्रँडेड जगणारा ..!" सहजच त्याच लक्ष आपल्या देहाकड गेलं,ते किड्या मुंग्या प्रमाणे सरपटत चाललं होतं. त्यांन आपली नजर हटवत समोर पाहिलं अजून थोडं झोपूनच वर सरकाव लागणार होतं. हळूहळू त्याच्या कानांवर गाड्यांचा आवाज येऊ लागला. त्याला हायसं वाटलं, कदाचित आपण रस्त्याच्या जवळपास असल्याचा अंदाज त्याला आला.पण क्षणात पुन्हा त्याचा उजवा पाय एका दगडावून घसरला आणि पुन्हा तो दहा-पंधरा फूट खाली घसरला. प्रचंड वेदनेने तो कळवळला पुन्हा पुन्हा त्याला आई, अंजली आणि मुलांची आठवण येत होती. लहान मुलाप्रमाणे तो रडू लागला. "आता किमान एक महिना तरी घरातच राहणार, मरू दे !सार आपण ठीक तर सारं ठीक, त्या चिमुरडीला तर नेहमी खेळायचं असतं माझ्याशी, अंजलीची तर माझ्याबद्दल नेहमीची तक्रार असते की मला वेळ देत नाही म्हणून, आईचं तर नेहमीचं रडगाणं ! पण आता एक महिना सुट्टी !" सकाळची दुपार झाली दुपारची संध्याकाळ या दरीत साधारण पंधरा सोळा तास तो फरपटत होता. साडेपाचच्या दरम्यान एका काटेरी जाळीतून कसा तर तो रस्त्यावर पोहचला.
बधिर अंगाने तो कसाबसा रस्त्याच्या कडेला नंबरी दगडाला टेकून बसला. त्याला अजूनही दिशांचा अंदाज येत नव्हता, पण अचानक त्याला पूर्वेला काहीतरी लोकांचा आवाजाचा गलका ऐकू आला. त्या आवाजाच्या दिशेने त्याने पाहिलं तर एक भल्या मोठ्या क्रेनद्वारे दरीतून एक कार वर काढताना त्याला दिसू लागली. त्याला कळेचना. सुरुवातीला आश्चर्य वाटलं पण नंतर त्याने विचार केला,"अरे माझ्याच मॅनेजरने पोलिसांना कळवले असेल,माझ नाव ऐकल्यावर एक गोधळच उठला असेल. ईथला डि.वाइ.एस.पी. माझा मित्रच आहे! मी काय ब्रँड आहे हे त्याला चांगलंच माहित आहे, त्यामुळे इतक्या झटपट मदत आली."अरे बाबांनो रात्रभर मी या दरीत अडकून होतो, गाडीचं काय घेऊन बसलात" अजय मोठ्या मुश्किलीने उठला, पाय ओढत ओढतच तो त्या क्रेनकडे चालू लागला, तोपर्यंत कार वर घेण्यात आली होती. एखादं मेलेले जनावर लोंबकळत याव तशी कार वर आली होती .कारच फाटलेल धड रस्त्याच्या एका बाजूला उतरवण्यात आलं, गाडीची दशा बघून अजयला भरून आलं पण आता त्याला इलाज नव्हता त्यांने पुन्हा एकदा आपल्या सर्व शरीरावरून हात फिरवला आणि तोंडातल्या तोंडात फुटला, " सर सलामत तो पगडी हजार!" या त्याच्या वाक्याने त्याच्याच चेहर्यावर हुरुप आला. तो आणखी चार पाच पावले गाडीकडे आला तेवढ्यात पोलीस आणि काही लोकांनी गाडीची मागची डिकी उघडली आणि त्या डिकीतून एक प्रेत बाहेर काढले आणि रस्त्यावर झोपवले. अजयला काहीच कळेना आपल्या सोबत आनखी कोन होत? तो पटकन पुढे आला सारी ताकत एकवटुन गतीने तो प्रेताजवळ पोहोचला आणि पाहतो तर काय ! "अजय कदमच प्रेत रस्त्यावर झोपल होत." क्षणभर त्याचा घसा हातून सूकून गेला. तो मोठमोठ्याने ओरडू लागला, तो ओरडत राहिला परंतु पोलिस आणि कर्मचारी झुडपाच्या फांद्या तोडून त्या प्रेतावर टाकत होती. अजय कदम ची ब्रँडेड गाडी जनावराच धड बनून एका बाजूला पडली होती आणि अजय कदम ची ब्रँडेड बोडी झुडपाच्या फांद्यांनी रस्त्याकडेला झाकली होती.

Comments
Post a Comment