शिवजयंती

प्रौढ प्रताप पुरंदर . . .
क्षत्रीय कुलावंतस् . . .
सिंहासनाधिश्वर . . . .
महाराजाधिराज . . . .
श्री छत्रपती शिवाजी महाराज  !!!


छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीराजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.






शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख 'शिवशंभू' असा होतो.
सर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांचा जन्म (१६३०) ते औरंगजेबाचा मृत्यू (१७०७) ह्या ७७ वर्षांच्या काळास इतिहासकार ‘शिवकाल’ असे म्हणतात. 
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ (भारताचा शोध) या ग्रंथात म्हणतात : "छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणाऱ्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले, त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले. छत्रपतींचा मृत्यू १६८० मध्ये झाला तरी त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्यविस्तार होतच राहिला."

कुटुंब आणि बालपण:
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.[३] इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूरअहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन मुसलमानी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली.

कौटुंबिक माहिती

हे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.
जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.

पत्नी

  1. सईबाई निंबाळकर
  2. सोयराबाई मोहिते
  3. पुतळाबाई पालकर
  4. लक्ष्मीबाई विचारे
  5. काशीबाई जाधव
  6. सगणाबाई शिंदे
  7. गुणवंतीबाई इंगळे
  8. सकवारबाई गायकवाड

वंशज

मुलगे

मुली

  • अंबिकाबाई महाडीक
  • कमळाबाई (सकवारबाईची कन्या)
  • दीपाबाई
  • राजकुंवरबाई शिर्के (सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्के यांची पत्नी)
  • राणूबाई पाटकर
  • सखुबाई निंबाळकर (सईबाईची मुलगी)

सुना

  • संभाजीच्या पत्नी येसूबाई
  • राजारामांच्या पत्नी ताराबाई (माहेरच्या मोहिते)
  • जानकीबाई
  • राजसबाई (पुत्र संभाजी - १६९८-१७६०)
  • अंबिकाबाई (सती गेली)
  • सगुणाबाई

नातवंडे

  • संभाजीचा मुलगा - शाहू
  • ताराबाईची राजारामाची मुले - दुसरा शिवाजी
  • राजसबाईची मुले - दुसरा संभाजी

पतवंडे

  • ताराबाईचा नातू रामराजा, याला शाहूने दत्तक घेतले, म्हणजे तो स्वतःचाच काका झाला.
  • दुसऱ्या संभाजीचा मुलगा - द्वितीय शिवाजी (खरेतर ३रा शिवाजी) (कोल्हापूर)

पुस्तके:
  • असे होते शिवराय (सौरभ म. कर्डे)
  • ईस्ट इंडिया कंपनी-Factory Records
  • उद्योजक शिवाजी महाराज (नामदेवराव जाधव)
  • डच ईस्ट इंडिया कंपनी-Factory Records
  • छत्रपती शिवाजी महाराज (लेखक - दि.वि. काळे)
  • छत्रपती शिवाजी महाराज (नामदेवराव जाधव)
  • छत्रपती शिवाजी महाराज : चरित्र आणि शिकवण (शिवप्रसाद मंत्री)
  • झुंज नियतीशी (अनुवादित, अनुवादक - इंद्रायणी चव्हाण, मूळ इंग्रजी - Challenging Destiny : Chhatrapati Shivaji - A Biography, लेखक - मेधा देशमुख-भास्करन)
  • डाग रजिस्टर- डच पत्रव्यवहार
  • पराक्रमापलीकडले शिवराय (प्रशांत लवटे)
  • श्री भोसले कुलाचा वंशवृक्ष (इंद्रजित सावंत), (२०१७)
  • मराठा-स्वराज्य संस्थापक श्रीशिवाजी महाराज (१९३२); लेखक - चिंतामण विनायक वैद्य
  • महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी (प्रा. डॉ. आनंद पाटील)
  • छत्रपती शिवाजी महाराज' प्रकाशन १९७० मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते   (पूर्वार्ध व उत्तरार्ध,पृष्ठसंख्या १२००) लेखक: वासुदेव सीताराम बेंद्रे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी (बालवाङ्मय, श्रीकांत गोवंडे)
  • श्री राजा शिवछत्रपती-खंड १ & २, (गजानन भास्कर मेहेंदळे)
  • राजा शिवछत्रपती (लेखक - ब.मो. पुरंदरे, १९६५)
  • शककर्ते शिवराय, खंद १ आणि २ (१९८२) लेखक - विजय देशमुख : (हिंदी अ्नुवादसुद्धा उपलब्ध)
  • शिवकालीन घोडदळ आणि युद्धनीती (डॉ. राम फाटक)
  • शिवकालीन दंतकथा (सुरेंद्र साळोखे)
  • शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ व २ : भारत इतिहास संशोधक मंडळ
  • शिवकालीन स्त्रियांचे अधिकार (नीलिमा भावे)
  • शिवछत्रपती समज-अपसमज (आनंद घोरपडे)
  • शिव छत्रपतींचे चरित्र (रघुनाथ विनायक हेरवाडकर)
  • शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध (३री आवृत्ती) (इंद्रजित सावंत?)
  • शिवाजी - दी ग्रेट गोरिल्ला (R..D. Palsokar)
  • शिवाजी - ((सर यदुनाथ सरकार)
  • शिवाजी आणि रामदास (सुनील चिंचोळकर)
  • शिवजयंती (नामदेवराव जाधव)
  • शिवराय (भाग १, २, ३, नामदेवराव जाधव)
  • शिवरायांची युद्धनीती (डाॅ. सच्चिदानंद शेवडे)
  • शिवाजीचे उर्दू भाषेतील संक्षिप्त चरित्र (लाला लजपत राय
  • शिवाजी व शिवकाल (सर यदुनाथ सरकार; मूळ इंग्रजी; मराठी अनुवाद वि. स. वाकसकर, १९३०)
  • शिवाजी द ग्रॅंड रिबेल (इंग्रजी, डेनिस किंकेड, १९३०), नवी आवृत्ती - ‘द ग्रॅंड रिबेल : अ‍ॅन इम्प्रेशन ऑफ शिवाजी’ (२०१५)
  • शिवाजी निबंधावली खंड १ व २
  • शिवाजी-निबंधावली भाग १ व २ : या दोन खंडांत श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अप्रत्यक्षपणे प्रकाश पाडणारे व शिवकालीन परिस्थितीचे वर्णन करणारे अनेक लेख संग्रहित केले आहेत.


अधिक माहितीसाठी: 

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)