जागतिक पुस्तक दिन



           🌻 *आनंदी पहाट* 🌻

             *अक्षय साहित्याची*
         
      *आज जागतिक पुस्तक दिन*

🌷📚🌷📚📕📚🌷📚🌷

        *ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा खजिना. जीवनाला समृद्ध करणारे सर्वच ज्ञान मग ते धर्म.. कला.. विज्ञान.. तंत्रज्ञान कोणतेही असो ग्रंथात दडलेय. ग्रंथ हा विवेक शिकवतो. जगाकडे बघण्याची दृष्टी देतो. मानवीय प्रगतीचा हा सर्वात मोठा स्रोत आहे.*
        *लोकमान्यांनी ग्रंथाला गुरु संबोधले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रगतीसाठी वाचन हा मंत्र दिलाय. आमच्या वेद.. उपनिषदे.. पुराणे.. गीता तसेच संत साहित्याने हे मनुष्य जीवन समृद्ध केलेय. या भूमितील व्यासमुनी असो वा वाल्मिकी जगविख्यात लेखक ठरलेत.*
        *हीच परंपरा जगतगुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानदेवांनी १६ व्या वर्षी तत्वज्ञान सांगणारी ज्ञानेश्वरी, तर छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत भाषेत ग्रंथ लिहून कायम ठेवली.*
        *गावातील ग्रंथालय हे गावाचे सांस्कृतिक वैभव आहे. वाचक म्हणजे देशातील सुज्ञ नागरिक अशी ओळख आहे. ग्रंथ वाचनामुळेच देशाला दिशा देणारे महापुरुष घडलेत. पुस्तक म्हणजे जीवनास धडा देणारा इतिहास.. जीवन सुखद करणारे वर्तमान आणि जीवन उन्नत करणारा भविष्यकाळ.*
        *नविन पुस्तक  उत्सुकतेने बघणे. त्याचा गंध अनुभवणे.. चाळणे.. वाचणे हा अवर्णनीय आनंद आहे. पुस्तक प्रेम करायला शिकवते. पुस्तक हे केवळ पुस्तकच नसते. पुस्तक आशा.. आकांक्षानी जीवन सदैव प्रवाही ठेवते. त्यात रमून स्वर्गीय सुखाची अनुभुती प्राप्त करता येते. पुस्तक ही प्रत्येकाची मर्मबंध ठेव असते.*
        *वाचन संस्कृती टिकविण्यासाठी झटणारे लेखक.. प्रकाशक.. वितरक, कधीही क्षय न होणारे अक्षर धन जपणारे ग्रंथपाल बंधूभगिनीं आणि सर्व वाचनप्रेमींना या पुस्तकदिनी शुभेच्छा..!!*

🌸📚🌸📚🌺📚🌸📚🌸

*_पुस्तकातील खूण कराया_*
*_दिले एकदा पीस पांढरे;_*
*_पिसाहुनि सुकुमार काहिसे_*
*_देता घेता त्यात थरारे._*

*_मेजावरचे वजन छानसे_*
*_म्हणून दिला नाजूक शिंपला;_*
*_देता घेता उमटे काही_*
*_मिना तयाचा त्यावर जडला_*

*_असेच काही द्यावे घ्यावे_*
*_दिला एकदा ताजा मरवा_*
*_देता घेता त्यात मिसळला_*
*_गंध मनातिल त्याहून हिरवा._*

🌷🌿🌸🍃🌺🍃🌸🌿🌷

*गीत : इंदिरा संत*       ✍
*संगीत : गिरीश जोशी*
*स्वर : पद्मजा फेणाणी-जोगळेकर*



       *!! घरी रहा !! सुरक्षित रहा !!*

    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
                *२३.०४.२०२०*


Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)