महात्मा बसवेश्वर Work is Worship

महात्मा बसवेश्वर यांची आज ( १०मे २०२४) जयंती कर्नाटकाच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासात महात्मा बसवेश्वरांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. आद्य समाज सुधारक तसेच कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे आणि वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन करणारी थोर विभुती म्हणून महात्मा बसवेश्वर यांच्याकडे पाहिले जाते. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया दिनी इ.स. ११०५ मध्ये बसवेश्वर यांचा जन्म झाला. धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण अशा क्षेत्रांतील त्यांचे कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून महात्मा बसवेश्वर यांच्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्रातील सोलापूर येथील मंगळवेढा येथे त्यांनी तब्बल ३१ वर्षे वास्तव्य केले होते. बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली, असे सांगितले जाते. आपल्या ज...