जगभरात दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केलं जातं. 11 जुलै 1987 रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. त्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघटनेने याची दखल घेवून 1989 सालापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं.