Posts
यूजीसीचे पहिले अध्यक्ष मा. सी.डी.देशमुख
- Get link
- X
- Other Apps
By
Library
यूजीसी चे पहिले अध्यक्ष मा. सी.डी.देशमुख आज २ ऑक्टोबर. आज पुण्यतिथी आहे एका थोर माणसाची. ह्या माणसाचा जन्म १४ जानेवारी १८९६ चा - महाडजवळ ‘नाते’ गावात - हा माणूस १९१२ साली मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिक परिक्षेत पहिला आला (तीपण संस्कृतची ‘जगन्नाथ शंकरशेट’ शिष्यवृत्ती मिळवून!) - पुढे उच्च शिक्षणासाठी हा माणूस शिष्यवृत्ती घेऊन केंब्रिजला गेला - १९१५ साली त्याने वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, आणि भूगर्भशास्त्र ह्या तिन्ही विषयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत त्याची पदवी पूर्ण केली - १९१८ मध्ये वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी तो आयसीएस परिक्षेत चक्क पहिला आला - लोकमान्य टिळकांना भेटून त्यांच्याकडे ह्या माणसाने इच्छा व्यक्त केली की सरकारी नोकरी न करता त्याला देशकार्य करायची इच्छा आहे - पण लोकमान्यांनी त्याला सांगितले की ह्या नोकरीचा अनुभव स्वराज्यात कामी येईल - लोकमान्यांची ही विनंती शिरसावंद्य मानून ह्या माणसाने ही सरकारी नोकरी करायचे ठरवले - मध्य प्रांतात महसूल सचिव, वित्त सचिव अशी पदं भूषवली (ह्या पदांवर काम करणारा हा सर्वात तरूण आयसीएस अधिकारी होता!) - सुमारे २१ वर्ष ह्या माणसाने सरकारी नोकरी
क्युसेक म्हणजे किती लिटर
- Get link
- X
- Other Apps
By
Library
One Cusec Is How Many Liters. दर पावसाळ्यामध्ये बातम्यांमध्ये वारंवार पाहायला मिळणाऱ्या 'इतक्या क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु' किंवा 'अमुक तमूक टीएमसी पाणी सोडलं' यासारख्या वाक्यांमधील टीएमसी किंवा क्युसेक शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? एक क्युसेक म्हणजे किती पाणी? याचसंदर्भात जाणून घेऊयात... क्युसेक म्हणजे किती लिटर? दर पावसळ्यामध्ये ऐकायला मिळणारा क्युसेक हा शब्द वाहतं द्रव्य मोजण्यासाठी केला जातो. आता एक क्युसेक म्हणजे किती असा प्रश्न पडला असेल तर 1 क्युसेक पाणी म्हणजे दर सेकंदाला 28.32 लिटर पाणी असा होतो. म्हणजेच 2 क्युसेक पाणी सोडलं असं म्हटलं तर दर सेकंदाला 56.64 (28.32X2) लिटर पाणी सोडण्यात आलं. क्युसेक हा शब्द क्युब पर सेकेण्ड्स वरुन आला आहे. प्रत्येक सेकंदाला किती क्युब पाणी सोडलं जातं हे यामधून समजतं. म्हणजेच आता कोयना धरणातून 32100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला याचा अर्थ लिटरमध्ये काढायचा झाला तर 28.32X32100 म्हणजेच सेकंदाला 9 लाख 9 हजार 72 लिटर पाणी धरणामधून सोडलं जात आहे. टीएमसी म्हणजे किती लिटर? टीएमसीचा फुलफॉर्म Thousand Million Cubic Feet अस
शाहु महाराज जयंती ( 150)
- Get link
- X
- Other Apps
By
Library
जन्म : २६ जुन १८७४ मृत्यु : ६ मे १९२२ न भूतो ना भविष्यती असा हा राजा होऊन गेला. लोककल्याणासाठी जे कार्य महाराजांनी केले, त्याला खरंच तोड नाही. भल्याभल्यांना जे जमलं नाही, त्या काळात ते काम या अवलियाने करून दाखवले. लोककल्याणकारी राजा शाहू महाराजांना म्हटले जाते, ते असेच नाही. इतर राजे इतिहासजमा झाले, पण हा राजा शिवरायांच्या नंतर आजसुद्धा लोकांच्या हृदयात खोलवर रुतून बसला आहे. आणि येणाऱ्या शेकडो वर्षांपर्यंत महाराजांचे स्थान कायम हृदयात असेल. जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा, आंतरजातीय विवाह कायदा, राखीव जागा ठेवण्याचा कायदा, पुनर्विवाहसंबंधी कायदा, काडीमोडसंबंधी कायदा, आणि इत्यादी वेगवेगळे कायदे त्यांनी आपल्या प्रांतात केले होते. या सोबत सक्तीचे मोफत शिक्षण, दलितांना शिक्षण, वसतिगृहाचे निर्माण, आरक्षणाची तरतूद, जातीभेद निर्मूलनासाठी प्रयत्न, शेती, पाणीपुरवठा, उद्योगधंदे निर्माण करणे आणि इत्यादी असंख्य समाज उपयोगी कार्य या राजाने त्या काळी करून ठेवले होते. जे आजसुद्धा असंख्यांना करायला जमत नाही. त्यांच्या महान विचारांची गरज आज आपल्या समाजाला आहे. विषमता पेरणाऱ्या युगात समता पेरणारा हा राजा